Crime News  file photo
सांगली

Sangli Crime : निमणीत महिलेवर खुरप्याने हल्ला

दुधारकर मळा परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : निमणी (ता. तासगाव) येथील दुधारकर मळा परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून एका महिलेवर खुरप्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगला संतोष हिप्परगी (वय ३५, रा. दुधारकर मळा, निमणी, ता. तासगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शंकर जाधव (रा. नेहरूनगर, ता. तासगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगला हिप्परगी या रोजंदारीवर कामास जातात. त्यांच्यासोबत संशयित आरोपी शंकर जाधव याची पत्नीदेखील कामाला जाते. शुक्रवारी सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर मंगला हिप्परगी घरातील कामे करत होत्या. त्यांची मुले जान्हवी व श्रीतेज अभ्यास करत होती, तर पती संतोष हिप्परगी हे कामावरून अद्याप घरी आले नव्हते.

दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पतीचा मित्र असलेला शंकर जाधव अचानक त्यांच्या घरात आला आणि त्याने मंगला यांच्याकडे आपली पत्नी लक्ष्मी हिला फोन लावण्यास सांगितले. मंगला या फोन घेण्यासाठी उठत असतानाच, शंकर जाधव याने हातात आणलेल्या खुरप्याने त्यांच्या डोक्यात वार करण्यास सुरुवात केली. मंगला यांनी आरडाओरड केल्याने भीतीपोटी दोन्ही मुले घराबाहेर पळाली.

मंगला यांनी प्रतिकार करत संशयिताचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने डावे मनगट, दंड, खांदा, उजवा हात, पाठ आणि डोक्यावर खुरप्याने गंभीर वार केले. या हल्ल्यातून सुटका करून घेत मंगला यांनी शेजारी राहणाऱ्या शोभा शरद आवळे यांच्या घराकडे धाव घेतली. यानंतर संशयित शंकर जाधव याने तेथून पळ काढला. या प्रकरणी तासगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT