सांगली

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील शाळेत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

अविनाश सुतार

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, खरशिंग, शिरढोण, अलकुड (एम), ढालगाव तसेच शहरातील वासल्य मूकबधिर येथे डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा झाला.

यावेळी पुढारी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शहरातील वासल्य मूकबधिर विद्यालयात तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त खाऊवाटप केले. तसेच 'दै. पुढारी' वृत्तपत्राचे वाचन विद्यार्थ्यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT