अपघातात जखमी डॉक्टर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू 
सांगली

Sangli Accident : अपघातात जखमी डॉक्टर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

कोकण पर्यटनावरून परतताना चार दिवसांपूर्वी मोटरीला झाला होता अपघात

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः अपघातात गंभीर जखमी झालेल्या बनपुरी (ता. आटपाडी) येथील डॉ. तन्वी दादासाहेब पुकळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोकण पर्यटनावरून परतताना चार दिवसांपूर्वी त्यांच्या मोटारीस अपघात झाला होता.

डॉ. तन्वी यांचे वडील दादासाहेब पुकळे हे आटपाडी तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी पुकळे कुटुंबिय कोकणात पर्यटनासाठी गेले होते. पर्यटनाहून परतत असताना त्यांच्या मोटारीस भीषण अपघात झाला होता. अपघातात तन्वी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते, मात्र चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. तन्वी यांनी नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. सांगली येथे त्या प्रॅक्टिस करीत होत्या. डॉक्टर तरुणीच्या अकाली निधनामुळे बनपुरी गावासह संपूर्ण आटपाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT