दुचाकीस्वार युवकाचा डंपरच्या चाकाखाली मृत्यू  
सांगली

Sangli Accident : दुचाकीस्वार युवकाचा डंपरच्या चाकाखाली मृत्यू

पलूस येथील कराड महामार्गावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

पलूस : पलूस येथे कराड महामार्गावरील एका दुकानासमोर बुधवारी दुपारी डंपरच्या चाकाखाली आल्याने दोन चाकी वाहनावरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. भैरू नरसिंग शिंदे (वय ३०, मूळ रा. नेवळी, ता. लातूर, सध्या रा. पलूस) असे मृत युवकाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी सांडगेवाडी एमआयडीसीतून एक डंपर (क्रमांक एमएच १० सीक्यू ४४१०) कराड-तासगाव महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी निघाला होता. त्याच वेळी भैरू शिंदे हे आपल्या दुचाकीवरून पलूसकडून तासगावच्या दिशेने जात होते. महामार्गावर डंपर पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या भैरू शिंदे यांनी डंपरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक डंपरच्या मागील टायरजवळील भागाला बसली. या धडकेनंतर दोन चाकी वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकले गेले, तर भैरू शिंदे यांचा तोल जाऊन ते थेट डंपरच्या मागील चाकाखाली आले. डंपरच्या चाकाखाली सापडल्याने भैरू शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना पलूस ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT