सांगली : जिल्ह्यातील ८ पोलिस अधिकार्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षातील अधिकार्यांना मैदानी पोस्टिंग देण्यात आली आहे. यामध्ये नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक अमोल बाळू माळी यांची कासेगाव पोलिस ठाणे, तर नियंत्रण कक्षातून सहायक निरीक्षण भरत तुकाराम पाटील यांच्याकडे कुरळप पोलिस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील निरीक्षक सुधीर तोरडमल यांची कडेगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली झाली. ईश्वरपूर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक किरण ब्रह्मदेव दिडवाघ यांची भिलवडी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. कासेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक हरिश्चंद्र हणमंत गावडे आणि कुरळप पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक विक्रम आनंदराव पाटील यांची सांगलीत नियंत्रण कक्षात रवानगी झाली आहे. नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक प्रशांत भीमराव निशाणदार यांची सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत बदली झाली आहे, स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील सहायक निरीक्षक लहू गौतम थाटे यांच्याकडे दहशतवादीविरोधी शाखेच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकार्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याच्या सूचना आहेत.