शिवणी धरणातील मासे तडफडू लागले; पाणीसाठा संपला 
सांगली

Sangli News : शिवणी धरणातील मासे तडफडू लागले; पाणीसाठा संपला

वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी धरणात सोडण्यासाठी मागणी

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल नलवडे

शिराळा : शिवणी धरणातील पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. शेतीसाठी पाण्याचा पुरवठा ठप्प झाल्याने ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.अनेक माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

शिवणी धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्यामुळे कालव्यांना पाणी सोडणे अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी शिराळा, खेड व शिवणी परिसरातील शेतजमिनी कोरड्या पडत आहेत. या कालव्यांचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT