शिराळा : सततच्या पावसाने झालेली पडझड. 
सांगली

Shirala Rain update : अतिवृष्टीने शिराळा तालुका वेढला

पूल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शिरशी व चांदोली अभयारण्य परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू झाली आहे. वारणा नदीने धोक्याची पातळी गाठत पात्राबाहेर वाहण्यास सुरुवात केली असून नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.

शिराळा, कोकरूड, चरण व सागांव मंडल क्षेत्रातही हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. डोंगराळ भागातील मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. मशागतीची कामे ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

तालुक्यातील ४९ पाझर तलावांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. वाकुर्डे (बु.) पाझर तलाव शंभर टक्के भरला असून मोरणा ८५ टक्के, अंत्री (बु.) ९० टक्के, शिवणी ५३ टक्के, टाकवे ५५ टक्के, रेठरे धरण ५६ टक्के, तर कार्वे १३ टक्के भरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT