सांगली : दहावी आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्ग शोधत असलेल्या पालकांसाठी दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित करण्यात आलेले 'एज्युदिशा २०२६' हे खास शैक्षणिक प्रदर्शन खरोखरच मार्गदर्शक ठरत आहे. या प्रदर्शनामधून करिअरच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांना सापडत आहेत. त्यांच्या साऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळत आहेत. प्रचंड उत्साह आणि उत्सुकता असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांची प्रदर्शनातील साऱ्याच स्टॉल्सवर मोठी गर्दी होत आहे. प्रदर्शनाचा आज (रविवारी) दि. १४ शेवटचा दिवस आहे.
दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित करण्यात आलेले 'एज्युदिशा २०२६' हे खास शैक्षणिक प्रदर्शन कच्छी जैन भवन येथे सुरू झाले आहे. काल, शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून सायंकाळपर्यंत या प्रदर्शनाला पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे मॅनेजमेंट ट्रस्टी विनायक भोसले, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणेचे डॉ. गणेश थिटे, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सोलापूरच्या ॲडमिशन आणि आउटरिच प्रमुख अनुप सिंग, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डॉ. पल्लवी जामसांडेकर, डेक्कन एन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. नीलेश खराडे, चाटे शिक्षण समूहाचे समन्वयक एस. जे. पाटील, विजयश्री अकॅडमीचे मनीषा पाटील, संतोष पाटील यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.
करिअरचे अनेक पर्याय एकाच छताखाली
करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी या भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण, या प्रदर्शनात विशेषतः 'न्यू एज स्किल्स' आणि 'ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज' (परदेशातील शिक्षणाच्या संधी) यावर विशेष भर दिला गेला आहे. केवळ पारंपरिक कोर्सेसच नव्हे, तर काळाची पावले ओळखून भविष्याचा वेध घेणारे करिअरचे अनेक पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, डिफेन्स अशा क्षेत्रांसोबतच एआय (Al), डेटा सायन्स, रोबोटिक्स, ॲग्रो टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील संधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून घेता येणार आहे.
दिग्गज संस्थांचा सहभाग...
या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक 'संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर' असून, 'विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे' हे पाॅवर्ड बाय प्रायोजक आहेत. यासोबतच एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप, डीआयसीई (DICE) डेक्कन इन्स्टिट्यूट हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. याशिवाय अन्य दिग्गज शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. पुणे, मुंबईसह देशभरातील नामांकित संस्थांशी थेट संवाद साधण्याची ही दुर्मीळ संधी आहे.
ठिकाण आणि वेळ...
कोठे?- सांगली-मिरज रोडवरील कच्छी जैन भवन (राम मंदिर कॉर्नर).
कधीपर्यंत?- आज दि. १४ जूनपर्यंत
वेळ?- सकाळी १०.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले.
संपर्क व नोंदणी...
विद्यार्थी, पालक किंवा शाळांनी विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेजचे नाव आणि मार्कशीटची प्रत पाठवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ९५४५३२७५४५