Pudhari Campus to Career  
सांगली

सांगलीत आज 'पुढारी कॅम्पस टू करिअर'

सर्व माहिती एकाच छताखाली; सोबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : बारावीनंतरची करिअरची विविध क्षेत्रे आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया, सीईटी, कॅप राऊंड याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ॲडमिशन प्रोसेसची संपूर्ण माहिती, टॉप कोर्सेसबाबत माहिती, करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती, स्कॉलरशिप व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून थेट काऊन्सिलिंग देणारा 'पुढारी कॅम्पस टू करिअर' सेमिनार आज, रविवारी (दि. १४) सांगलीत होत आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा सेमिनार मोफत आहे.

दैनिक ‘पुढारी’च्यावतीने आयोजित 'पुढारी कॅम्पस टू करिअर' सेमिनार दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता रजपूत शैक्षणिक संकुल, व्हाईट हाऊस, गुलमोहर कॉलनी, रिलायन्स मार्केटसमोर, सांगली येथे होणार आहे. बारावीचा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतरच खऱ्याअर्थाने करिअरला दिशा मिळत असते. या वळणावर विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी दैनिक ‘पुढारी’च्यावतीने पुढारी कॅम्पस टू करिअर या अत्यंत महत्त्वाच्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित हा सेमिनार मोफत आहे. या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.

सांगलीमध्ये सेमिनार

केव्हा – आज रविवार, १४ जून २६

कुठे – रजपूत शैक्षणिक संकुल, व्हाईट हाऊस, गुलमोहर कॉलनी, रिलायन्स मार्केटसमोर, सांगली.

या उपक्रमासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.

वेळ – दुपारी ३ वाजता.

लाभ घेण्याचे आवाहन...

करिअरबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना या सेमिनारमध्ये मिळणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी असलेली संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाची संधी...

सोप्या भाषेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन. प्रवेश प्रक्रिया ते कॉलेज निवडीपर्यंत संपूर्ण माहिती. शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन. निवडक विद्यार्थ्यांना तीन नामांकित विद्यापीठांना भेट देण्याची संधी. अधिक माहितीसाठी संपर्क : 95700 17003

कागदपत्रांबाबत माहिती

सर्व प्रवेश प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, त्यांची अचूकता, तपासणी आणि वेळेत सादरीकरण यासाठीही विद्यार्थ्यांना व पालकांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे. त्यामुळे 'पुढारी कॅम्पस टू करिअर'अंतर्गत आयोजित हा सेमिनार करिअर घडविणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी निर्णायक ठरणार आहेत.

नामांकित विद्यापीठांना भेटीची संधी

सेमिनारमधून निवडलेल्या जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांना 'पुढारी' माध्यम समूहाच्यावतीने पुणे येथे दोन दिवसाची माफक दरात सहल आयोजित केली असून पुण्यातील नामांकित संस्थेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊन स्वेच्छेने करिअर निवडण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

सांगलीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

३ ते ३.२० - डॉ. साची जैन

३.२० ते ३.४० - मुकेश अगरवाल

३.४० ते ४ - शंतनू देशपांडे

४ ते ४.२० - अजित गट्टे

४.२० ते ४.४० - डॉ. स्वप्निल सोनकांबळे/ डॉ. मिलिंद ओव्हाळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT