Sangli Municipal Corporation Pudhari
सांगली

Sangli News : घरपट्टीबाबत ५४ प्रश्न; प्रशासनाला मागितली उत्तरे

सांगलीत बुधवारी जनसुनावणी : खासदार, आमदार, पालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांना निमंत्रण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : घरपट्टी वाढ विरोधी कृती समितीने महापालिका प्रशासनाकडून ५४ प्रस्तावांची उत्तरे मागितली आहेत. कृती समितीतर्फे बुधवार, दि. १० रोजी दुपारी ४ वाजता रोटरी हॉल गणेशनगर सांगली येथे जनसुनावणी आयोजित केली आहे. या जनसुनावणीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण खासदार, दोन आमदार तसेच महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांना देण्यात आले आहे.

घरपट्टी वाढल्याने अनेक मालमत्ता धारकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी, सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी बुधवारी जनसुनावणीचे आयोजन केले आहे. या जनसुनावणीस उपस्थित राहण्याबाबत खा. विशाल पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, आयुक्त संजीता महापात्र, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित कोळी यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, हणमंत पवार, वि. द. बर्वे, रवींद्र वळवडे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी दिली.

सध्या भांडवली मूल्यांवर घरपट्टी आकारणी कामकाज सुरु आहे त्यास कायदेशीर आधार काय आहे?, भाडे मुल्यांवर घरपट्टी आकारणीचा कायदा, नियम रद्द झाला आहे का? घरपट्टीसाठी महापालिकेने उपविधी करणे बंधनकारक आहे अथवा नाही, घरपट्टीसाठीची उपविधी / नियम केल्याशिवाय मनपा घरपट्टी आकारणी करु शकते का? सध्याची भांडवली मूल्यांवर आधारीत घरपट्टी आकारणीसाठी भांडवली मूल्य निश्चित करणे विनियम २०२५ असे नांव दिले आहे, हे विनियम सूचना हरकतीसाठी जाहीर प्रकटन केल्याची तारीख, कालावधी, त्याचा पुरावा द्यावा, उपयोगकर्ता शुल्क, साफ सफाई कर, पाणी पुरवठा लाभ कर अग्निशमन कर, वृक्ष कर घेण्यासाठीचा महापालिकेने कायदा, उपविधी केली आहे काय?, आदी प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT