Nurses Protest 
सांगली

Nurses Protest| मिरज सिव्हिल : परिचारिकांचे अचानक आंदोलन

प्रशासनाची उडाली तारांबळ : रुग्णसेवेवर झाला परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मिरज : विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मिरज शाखेच्या सुमारे दीडशे परिचारिकांनी अचानक काम बंद आंदोलन केले. यामुळे रुग्णालय प्रशासनाची कमालीची तारांबळ उडाली असून रुग्णसेवेवरही त्याचा मोठा परिणाम झाला. अखेर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रलंबित अतिरिक्त घरभाडे भत्ता शासन निर्णयाच्या दिनांकापासून परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना थकबाकीसह त्वरित द्यावा, २०२१ पासूनचा 'एमजेपीजेएवाय' योजनेअंतर्गतचा प्रोत्साहनात्मक भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व अद्ययावत सुविधांसह चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात यावी, रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात मानकांनुसार आवश्यक तेवढे मनुष्यबळ पुरवण्यात यावे आणि नवीन विभाग सुरू करण्यापूर्वी तिथे कर्मचारी नियुक्त करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

अचानक आंदोलन...

मागण्यांबाबत तीन दिवसांपूर्वीच संघटनेची प्रशासनासोबत बैठक झाली होती. यामध्ये बहुतांश मागण्या प्रशासनाने मान्य केल्या होत्या, मात्र त्याचे इतिवृत्त (मिनिट्स) लेखी स्वरूपात देण्यात आले नव्हते. हे लेखी पत्र मिळावे या मागणीसाठी सोमवारी परिचारिकांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT