वाकुर्डे खुर्दच्या सरपंचांवरील अविश्वास मंजूर  
सांगली

Sangli News : वाकुर्डे खुर्दच्या सरपंचांवरील अविश्वास मंजूर

२८५ मतांच्या बहुमताने पद गमावले

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : वाकुर्डे खुर्द सरपंच शीतल बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी ९ विरुद्ध १ अशा बहुमताने अविश्वास ठराव तहसीलदारांकडे दाखल केला होता. त्यानुसार ३० जूनरोजी तहसीलदार श्यामला खोत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. सभेत अविश्वास ठरावाला नऊ विरुद्ध एक असे बहुमत मिळाले. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी स्नेहल नौकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अविश्वास ठरावाची कारणे...

गावातील विकासकामांमध्ये कमिशन घेणे, कामे वेळेत पूर्ण न करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न देणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे तसेच ग्रामस्थांशी अरेरावीची वागणूक देणे.

नाराजीचे एक कारण

६ एप्रिलरोजी सरपंच शीतल पाटील आणि त्यांचे पती बाळासाहेब पाटील यांना विकासकामांतील कथित कमिशनप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), सांगली यांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT