सांगली : पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालय येथे औषधे उघड्यावर ठेवण्यात आली असून, याप्रकरणी रुग्णालय प्रशासन व संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सृष्टी संवर्धन फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह शासनाकडे केली आहे.
निवेदनानुसार, रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांचा साठा पुरुष शल्य विभाग, औषध भांडार व औषध डिस्पेंसरीच्या बाहेर पॅसेजमध्ये चुकीच्या पध्दतीने तर काही साठा महिलांच्या स्वच्छतागृहाशेजारीही ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.