Rajmata Jijau Bus 
सांगली

Sangli News : सांगलीत राजमाता जिजाऊ बसचे लोकार्पण

जिल्ह्यात २५ बसेस दाखल; प्रवासी सेवा सुरू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या ५ 'राजमाता जिजाऊ' बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी सांगली बसस्थानकात पार पडला. सांगली जिल्ह्यात एकूण २५ बसेस दाखल झाल्या आहेत. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगुले आदी उपस्थित होते.

नव्याने दाखल झालेल्या या जिजाऊ बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी एलईडी मार्गफलक, पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, डिजिटल जाहिरात फलक, व्हीटीएस ट्रॅकिंग सिस्टिम आणि पॅनिक बटन अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेस सांगलीहून कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावर चालवण्यात येणार असून, प्रवाशांनी या नवीन बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी विभागीय लेखाधिकारी संदीप फोंडे, सहायक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल माने, स्थानक प्रमुख महेश पाटील, प्रभारक सौरभ जाधव तसेच सहायक वाहतूक निरीक्षक अनिलकुमार जगताप, युवराज डोळस, दीनानाथ डवरी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT