सलगरे गावात दूध भेसळीचा पर्दाफाश  
सांगली

Sangli News : सलगरे गावात दूध भेसळीचा पर्दाफाश

भुकटी, खाद्यतेलासह भेसळीचे साहित्य जप्त ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मळणगाव : आर्थिक नफा कमावण्यासाठी दुधामध्ये भेसळ करून थेट जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केला आहे. सलगरे (ता. मिरज) येथील जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकून प्रशासनाच्या पथकाने गायी-म्हशीचे दूध, डेअरी परमिएट भुकटी, शुद्ध खाद्यतेल तसेच भेसळीसाठी वापरले जाणारे मिक्सर मशीन, असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुणराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी पहाटे सलगरे येथील शिवतेज पेट्रोल पंपाजवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्यावर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिली कारवाई बजरंग बाबासाहेब पाटील (रा. गोदे वस्ती, सलगरे) याच्या गोठ्यावर झाली. त्याच्या ताब्यातून १२ लिटर गायीचे दूध, ४२ लिटर म्हशीचे दूध, २४ लिटर शुद्ध सूर्यफूल तेल आणि एक मिक्सर मशीन, असा एकूण १३ हजार १६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच परिसरातील रामचंद्र धोंडिराम पाटील (रा. जुना वाडा, सलगरे) याच्या ताब्यातून १८ लिटर कच्चे गायीचे दूध, ४ लिटर कच्चे म्हशीचे दूध, नामवंत कंपनीची सुमारे ७४.५ किलो डेअरी परमिएट भुकटी, ६ किलो शुद्ध सोयाबीन तेल आणि मिक्सर मशीन व भांडी असा एकूण ११ हजार ४४५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या संपूर्ण साहित्याचा वापर थेट दूध भेसळीसाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बजरंग पाटील व रामचंद्र पाटील यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांची फसवणूक करण्याच्या व लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने हे साहित्य आणून ठेवले होते. जयसिंगपूर येथील विजय ढवळे याने त्यांना डेअरी परमिएट भुकटी पुरवल्याचा संशय आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक शिवशरण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT