बेपत्ता File Photo
सांगली

Sangli News| कोकरूड येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) येथून २५ वर्षीय विवाहित महिला आपल्या आठ आणि सहा वर्षांच्या दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून कोकरूड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भगवान गणपती चौगुले (वय ५७, रा. चौगुले गल्ली, कोकरूड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी ऋतुजा ऋषिकेश आंबेकर (वय २५) तसेच तिची दोन मुले शिवण्या ऋषिकेश आंबेकर (वय ८) आणि राघव ऋषिकेश आंबेकर (वय ६) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.

दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोकरूड येथे ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT