हातनूर (ता. तासगाव) : येथील आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, अर्जुन पाटील व अन्य. 
सांगली

Sangli News : लोकप्रतिनिधींकडून आरोग्य विभागाची झाडाझडती

मांजर्डे, हातनूर आरोग्य केंद्रात आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

मांजर्डे : तासगाव तालुक्यातील मांजर्डे व हातनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा बैठक झाली. या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील व अर्जुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

यावेळी मोहन पाटील म्हणाले, परिसरातील गोरगरीब जनतेला स्थानिक पातळीवरच सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पावसाळ्यात सामान्य रुग्णांचे हाल होऊ नयेत आणि साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आतापासूनच आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

या बैठकीस पंचायत समिती सदस्य प्रमोद शेंडगे, सुनील जाधव, विद्याराणी पाटील, सुभाष पाटील, डॉ. विशाल करांडे, डॉ. संदीप माने, डॉ. माळी, डॉ. नितीन परीट, डॉ. मयुरी परीट, बांधकाम विभागाचे निपाणीकर, बारवकर, हर्षवर्धन मोहिते, प्रकाश मोहिते यांच्यासह आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT