Sangli Jilha Parishad Pudhari File Photo
सांगली

Sangli News : शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश

सर्वसाधारण सभेत सदस्यांचा कारभारावर आरोप : शासनाकडे ठराव पाठविण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सांगली : प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या कार्यकाळात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सभेत सदस्यांनी केली. या मागणीची दखल घेत अध्यक्षा संगीता पाटील व उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी गायकवाड यांच्या कार्यकाळाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही विभागाचा कार्यभार देऊ नये, याबाबत शासनाकडे ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

इन्ट्रॅक्टीव्ह पॅनेलच्या खरेदीसह अनेक गोष्टींमध्ये मोठा गैरप्रकार झाला आहे. केंद्रप्रमुख पदोन्नतीला स्थगिती असतानाही पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करत, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चाही सदस्यांनी मांडली.

जिल्ह्यात काही शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली; मात्र त्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही. तसेच काही शाळांमध्ये महिनाभर शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावर उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली. चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे पाठवणार. तोपर्यत गायकवाड यांना माध्यमिक विभागात हजर करून घेणार नाही. मतदार यादी पुनरिक्षणाचे काम २९ पर्यत संपेल, तत्पूर्वी गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT