Sangli News: विठ्ठलवाडी येथे उसाच्या फडात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू File Photo
सांगली

Sangli News: विठ्ठलवाडी येथे उसाच्या फडात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

पाचट पेटविल्यानंतर आगीने चोहोबाजूने वेढले

पुढारी वृत्तसेवा

पलूस : शेतातील पाचट जाळत असताना शेजारच्या उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात 85 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. गणपती सदाशिव भोसले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विठ्ठलवाडी (ता. पलूस) येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, गणपती भोसले हे गुरुवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. उसाची तोडणी झाल्यानंतर पाचट जाळण्याचे काम ते करत होते. पाला जाळत असताना अचानक त्यांच्या शेजारच्या शेतातील उसानेही पेट घेतला. ही आग आटोक्यात आणण्यासाठी भोसले यांनी धाव घेतली. मात्र, वाऱ्याचा वेग आणि आगीच्या ज्वाळांमुळे त्यांना काही समजायच्या आतच आगीने त्यांना चोहोबाजूंनी वेढले. भोसले यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत होरपळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी, आमणापूर आणि पलूस परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद पलूस पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT