सांगली : मागणीसाठी स्वाती पारधी, योगेंद्र थोरात यांनी ठिय्या आंदोलन केले. (छाया : सचिन सुतार) 
सांगली

Sangli News : अश्विनी कोळी यांना आज नगरसेवक पद रद्दचे पत्र

प्रभाग समिती क्रमांक ४ चे सभापती पदही होणार रिक्त; कारवाईसाठी महापालिकेत आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सभापती अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी माजी नगरसेवक स्वाती पारधी व माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्द झाल्याचे पत्र गुरुवारी महापालिका प्रशासनाकडून अश्विनी कोळी यांना दिले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०-ब या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागेवर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या अश्विनी कोळी निवडून आल्या होत्या. दरम्यान, अश्विनी कोळी यांचे अनुसूचित जमाती (एसटी) प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार करण्यात आली होती. अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीने अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यानुसार महापालिकेने त्यांचे नगरसेवक पद तत्काळ रद्द करावे, या मागणीसाठी स्वाती पारधी आणि योगेंद्र थोरात यांनी बुधवारी महापालिकेत आंदोलन केले. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयावर अपिल करणे व स्थगिती येण्यासाठी महापालिका विलंब करत आहे काय, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने कोळी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या हालचालींना गती दिली आहे. नगरसेवक पद रद्द झाल्याचे पत्र गुरुवारी कोळी यांना मिळेल, असे प्रशासनातून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT