Child marriage pudhari photo
सांगली

Sangli News : जांभुळवाडीत बालविवाह रोखला; मुलीची सुधारगृहात रवानगी

ईश्वरपूर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : जांभुळवाडी (ता. वाळवा) येथील बिरोबा मंदिर परिसरात ईश्वरपूर पोलिसांनी शनिवारी दुपारी धडक कारवाई करत होणारा बालविवाह रोखला. पोलिसांनी नवरदेवासह १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले असून, मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

ईश्वरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना जांभुळवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान घुगे, पोलिस हवालदार गर्जे, महिला पोलिस हवालदार गोतावडे यांच्या पथकाने तत्काळ बिरोबा मंदिर गाठले. तेथे गोवा राज्यातील मुलगा (वय २१) आणि पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलगी (वय १५) यांचा विवाह होणार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT