Vedant bandgar murder case 
सांगली

Vedant bandgar murder case : वेदांतच्‍या हत्येच्या निषेधार्थ उद्या सांगलीत 'कॅंडल मार्च'

निष्पापाच्या वेदांतच्या मृत्यूनंतर सांगलीकरांमध्ये संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : आरग रेल्वे मालधक्का येथील हमालांच्या अंतर्गत वादात जत पोलिस प्रशासनाने घेतलेल्या बघ्यांच्या भूमिकेमुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेच्‍या निषेधार्थ व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी सांगलीत उद्या, सोमवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.

हमालांच्या अंतर्गत वादातून गुरुवार, ११ जून रोजी सायंकाळी वेदांत मारुती बंडगर या १३ वर्षीय बालकाची घरात घुसून क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ​या चिमुरड्या वेदांतला त्वरित न्याय मिळावा आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी ‘कॅंडल मार्च’ आयोजित करण्यात आला आहे. हा मार्च शहीद अशोक कामटे चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, विश्रामबाग यादरम्यान काढला जाणार आहे. वेदांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सांगलीतील सर्व न्यायप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कॅंडल मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पृथ्वीराज पवार, हणमंतराव पवार, विकास मगदूम, सतीश साखळकर, शंभुराज काटकर, डॉ. संजय पाटील आणि सहकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT