सांगली

Sangli News: विसापूर स्मशानभूमीत जादूटोणा

विसापूर (ता. तासगाव) येथील स्मशानभूमीत काळ्या कपड्यात तरुणाचे फोटो, नारळ, लिंबू बांधून पूजल्याचे आढळल्याने येथे खळबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : विसापूर (ता. तासगाव) येथील स्मशानभूमीत काळ्या कपड्यात तरुणाचे फोटो, नारळ, लिंबू बांधून पूजल्याचे आढळल्याने येथे खळबळ उडाली आहे. आजीच्या रक्षाविसर्जनादिवशीच हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिक व महिलांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, हा प्रकार निव्वळ भीती दाखवण्यासाठी केला असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. याबाबत पंकज अमृतसागर यांनी तासगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

येथील माजी उपसरपंच अशोक अमृतसागर यांच्या सासूचे निधन झाले. त्यांच्यावर तासगाव रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. बुधवारी रक्षाविसर्जन होते. रक्षा विसर्जनासाठी त्यांचे नातेवाईक स्मशानभूमीत सकाळी गेले असता, त्यांना त्या ठिकाणी तरुणाचे पाच फोटो, नारळ, लिंबू , सुया, बिब्बे असे साहित्य काळ्या फडक्यात बांधून पूजलेले दिसून आले. ते पंकज अमृतसागर यांचे असल्याचे दिसून आले. अमृतसागर यांनी या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली. समितीचे तासगाव शाखेचे वासुदेव गुरव, अमर खोत, भास्कर सदाकाळे, कार्यवाह राहुल थोरात यांनी पोलिस निरीक्षक यांना पत्र दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT