गणेशनगर स्वीमिंग टँक परिसरातील झाडांची कत्तल 
सांगली

Sangli News : गणेशनगर स्वीमिंग टँक परिसरातील झाडांची कत्तल?

धोकादायक नसलेली झाडेही मध्यातून कापली; नागरिकांकडून चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील गणेशनगरमधील स्वीमिंग टँक परिसरात झाडांच्या धोकादायक फांद्या आणि विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या छाटण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात फांद्या छाटण्याऐवजी काही झाडे मध्यातून कापून त्यांची उंचीच कमी करण्यात आली आहे. धोकादायक नसलेली काही झाडेही मध्यातून कापली असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

गणेशनगर परिसरातील काही झाडांच्या फांद्या विजेच्या तारांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने फांद्या छाटण्याची आवश्यकता होती. त्यासाठी महापालिकेकडून परवानगीही घेण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष काम करताना केवळ धोकादायक फांद्या काढण्याऐवजी सुमारे सात ते आठ झाडांची उंची मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली. काही नागरिकांनी यामागे वेगळे कारण असल्याचा दावा केला आहे. स्वीमिंग टँकमध्ये झाडांची पाने व कचरा पडून पाणी खराब होऊ नये, या उद्देशाने झाडे कापण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे मंजुरीच्या अटींनुसार काम झाले की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करून परवानगी नेमकी कशासाठी देण्यात आली होती आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. दोषींवर कारवाईचीही मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT