नेलकरंजीत तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू! 
सांगली

Sangli Crime : नेलकरंजीत तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू!

भिवघाट-खरसुंडी रस्त्यावर डोंगराळ भागातील घटना

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील अनिल घाडगे (वय ३०) या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या अनिलचा मृतदेह मंगळवार, दि. २९ रोजी सकाळी भिवघाट-खरसुंडी रस्त्यावर डोंगराळ भागात सुमारे ५० फूट खोल विहिरीत आढळून आला. या घटनेची आटपाडी पोलिसात नोंद आहे.

अनिल घाडगे हा सोमवारपासून बेपत्ता होता. मंगळवारी सकाळी डोंगराळ भागातील एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. सुरुवातीला विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पाण्याची पातळी कमी होत नव्हती. अखेर सांगली येथील ‘आयुष टीम’ला पाचारण केले.

आयुष टीमने घटनास्थळी दाखल होत पाण्याने भरलेल्या विहिरीत उतरून अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अनिल यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT