ईश्वरपूर : नवेखेड (ता. वाळवा) येथील वाळवा रस्त्यावर डम्पिंगला मागून धडकल्याने दुचाकीस्वार विष्णू आनंदा पाटील (वय 58, रा. नवेखेड ) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. याबाबत सहदेव पाटील यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विष्णू पाटील हे दुचाकीवरून (एमएच 10 एयू 4867) वाळवा येथे गेले होते. दुपारी 2 वाजता ते गावी परतत होते. नवेखेडनजीक ट्रॅक्टरच्या (एमएच 10 सी 8804) पाठीमागे भाताची पोती भरलेले डम्पिंग उभे होते. त्याला विष्णू यांची दुचाकी धडकली. या धडकेत ते रस्त्यावर पडले. गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.