खुनातील संशयितांची होणार ओळखपरेड (File Photo)
सांगली

Sangli Murder Case : खुनातील संशयितांची होणार ओळखपरेड

तिघा नशेखोरांनी केलेल्या हल्ल्याचे प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील लिमये मळा येथे क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे यांचा खून करण्यात आला होता. तर नशेखोर हल्लेखोरांच्या हल्ल्यात सुयश क्रांतिकुमार शेडबाळे हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान अल्पवयीन हल्लेखोरासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची न्यायालयासमोर ओळखपरेड होणार असल्याचे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.

मयत क्रांतिकुमार शेडबाळे हे इनामधामणीमध्ये राहण्यास आहेत. ते शनिवारी रात्री इनामधामणी ते स्फूर्ती चौककडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या हेडलाईटचा उजेड लिमये मळा येथे अंधारात नशा करत बसलेल्या हल्लेखोरांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांना चेहऱ्यावर उजेड का पाडला? अशी विचारणा केली. त्यावेळी हल्लेखोरांना त्यांना शिवीगाळ केली. तसेच क्रांतिकुमार यांनीही येथे तुम्ही बसायचे नाही, असे म्हणून तेथून दुचाकीवरून निघून गेले. परंतु या झटापटीमध्ये क्रांतिकुमार यांचा मोबाईल मात्र लिमये मळ्यातील कच्च्या रस्त्यावर पडला.

त्यानंतर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास क्रांतिकुमार हे त्यांचा मुलगा सुयश याला घेऊन त्यांचा मोबाईल शोधण्यासाठी परत त्या ठिकाणी दुचाकीवरून त्या ठिकाणी आहे. त्यावेळीही तिघे संशयित हल्लेखोर त्याच ठिकाणी नशा करत बसले होते. क्रांतिकुमार परत मुलाला घेऊन आल्याने संशयित हल्लेखोरांनी पुन्हा दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदवार वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर मात्र संशयितांनी क्रांतिकुमार यांच्या डोक्यात दडग घालून त्यांना जागीच ठार केले. तर सुजय यालाही दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. परंतु सुयश याने आरडाओरडा केल्याने तेथून काही अंतरावर सुरू असणाऱ्या बाजारातील नागरीकांनी तीन पैकी दोन संशयितांना पकडून त्यांना बेदम चोप दिला. दरम्यान सुयश शेडबाळे याने याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तीन अनोळखी संशयितांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन हल्लेखोरासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT