सांगली : महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्स उपक्रमांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना प्रदान केल्या जाणाऱ्या डिजिटल सेवांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार अधिकृतपणे मान्यताप्राप्त आयटी सल्लागार कंपन्यांच्या सेवांचा अवलंब करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने दि. 05 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सहा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांना आगामी पाच वर्षांसाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
महानगरपालिकेमध्ये या कंपन्यांकडून मिळणाऱ्या सेवांचे प्रमुख क्षेत्र : ई-गव्हर्नन्स प्रणाली विकास, नागरिक सेवा डिजिटायझेशन, प्रकल्प व्यवस्थापन, तांत्रिक ऑडिट व आयटी प्रणालींची गुणवत्ता पडताळणी, धोरण सल्ला, डेटा व्यवस्थापन व विश्लेषण, आधुनिक स्मार्ट सोल्यूशन्स.
अपेक्षित प्रशासकीय व शहरी सुधारणा या संस्थांच्या तांत्रिक कौशल्यामुळे महापालिकेच्या आयटी प्रकल्पांना लाभ होणार आहेत. डिजिटल सेवांची गुणवत्ता वाढणार आहे. नागरिकांना मिळणाऱ्या ऑनलाईन सेवांचा वेग, अचूकता आणि उपलब्धता सुधारेल. आयटी प्रक्रियांमुळे विभागांमध्ये पारदर्शकता, वेळेतील अचूकता आणि प्रगती नियंत्रण मजबूत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांशी संवाद, तक्रार निवारण आणि सेवा प्रणाली अधिक सुलभ होईल.