Sangli municipal corporation: दिव्यांग कल्याणासाठी 57 लाख सुपूर्द Pudhari
सांगली

Sangli municipal corporation: दिव्यांग कल्याणासाठी 57 लाख सुपूर्द

महापालिका क्षेत्रातील 1912 लाभार्थ्यांना उदरनिर्वाह भत्ता वाटप

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्यावतीने दिव्यांग सक्षमीकरण अभियानांतर्गत 2025-26 आर्थिक वर्षातील 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीतून पात्र 1912 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 हजार रुपये याप्रमाणे एकूण 57 लाख 36 हजार रुपये उदरनिर्वाह भत्त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप सोमवारी झाले.

महानगरपालिका मुख्यालय येथे आयोजित या सोहळ्यास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नायकवडी, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, तसेच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, महिला व बाल विकास अधिकारी बाबासाहेब माळी उपस्थित होते.

दिव्यांगांना सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आगामी आर्थिक वर्षात ऑनलाईन नोंदणी व डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT