सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : बागमजूर, होर्डिंग्जचा आठवड्यात अहवाल

स्थायी सभेत आदेश : गॅस कंपनीकडून 45 लाख वसूल होणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : बाग मजूर पुरवठा ठेका व नवीन होर्डिंग्ज ठेकाप्रकरणी पुढील आठवड्यात स्थायी समितीसमोर अहवाल सादर करा, असे निर्देश सभापती अतुल माने यांनी बुधवारी दिले. हनुमाननगर अग्निशमन केंद्राच्या वाढीव 45 लाख खर्चाला मंजुरी देण्यात आली. सांगली व कुपवाड क्षेत्रात गॅस वाहिनी टाकताना महापालिकेच्या जलवाहिन्यांचे सुमारे 45 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. या कंपनीच्या अनामत रकमेतून ही रक्कम वसूल करावी, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

महापालिका सभागृहात बुधवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. बाग मजुरांच्या आर्थिक शोषणाचा अनुभव पाहता, महापालिकेमार्फत मानधनावर बाग मजूर नियुक्त करणे आणि मजूर पुरवठा ठेका, याबाबत तुलनात्मक अहवाल स्थायीच्या पुढील सभेपुढे सादर करा, असे आदेश सभापती अतुल माने यांनी दिले. महापालिका क्षेत्रात नवीन होर्डिंग्जची उभारणी सुरू आहे. त्यासंदर्भातही स्थायी समितीच्या गेल्या सभेत सदस्यांनी अनेक शंका उपस्थित करून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यासंदर्भातही अहवाल मागवला होता. हा अहवालही पुढील सभेपुढे सादर करण्याचे आदेश माने यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT