Sangli Municipal Corporation Pudhari Photo
सांगली

Sangli Municipal Corporation: महापालिकेच्या २७६ बदली कर्मचाऱ्यांना 'फिक्स टर्म' नियुक्ती

सर्वसाधारण सभेचा ठराव; आणखी १०० सफाई कर्मचारी मानधनावर नियुक्त होणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या २७६ बदली कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांसाठी 'फिक्स्ड्‌ टर्म एम्प्लॉयमेंट' (कंत्राटी/मर्यादित कालावधी नियुक्ती) तत्त्वावर महिन्याला २६ दिवस काम उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जूनमधील महासभेत झाला. त्याचबरोबर शहरातील स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यासाठी मानधन तत्त्वावर १०० अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्यासही सभेने मंजुरी दिली.

महापालिका स्थापन झाल्यापासून कार्यरत असलेल्या सुमारे २७६ बदली कर्मचाऱ्यांच्याबाबतीत यापूर्वी केवळ काही विभागांसाठी २५ ते २६ दिवस काम देण्यास मंजुरी होती. मात्र सर्व बदली कर्मचाऱ्यांसाठी एकसमान धोरण नव्हते. या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत न्यायालयात दावे प्रलंबित असून शासनाकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना नियमित काम मिळावे आणि महापालिकेलाही अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन औद्योगिक संबंध संहिता-२०२० अंतर्गत ११ महिन्यांसाठी फिक्स्ड्‌ टर्म नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहराची वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेची वाढती गरज लक्षात घेऊन तातडीने १०० अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर भरती करण्याचा ठरावही महासभेत मंजूर झाला आहे. त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT