सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : जलवाहिन्या फुटल्या; ठेकेदारावर करा फौजदारी

अतिरिक्त आयुक्त ः गॅस पाईपलाईनसाठी महापालिकेचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईनच्या कामामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर फौजदारी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी शहर अभियंत्यांना दिले.

स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरात ठिकठिकाणी ठेकेदाराने खड्डे खणून ठेवले आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलवाहिन्या फुटल्या आहेत. हनुमाननगर, विठ्ठलनगर, धामणी रोड या परिसरात सोळाशे मीटर जलवाहिनी खराब झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 42 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या जलवाहिन्यांची दुरुस्ती ठेकेदाराच्या साडेपाच कोटी रुपयांच्या डिपॉझिटमधून करण्यात येणार आहे. तसेच ठेकेदाराला 5 लाख 20 हजार रुपयांचा दंडही आकारला जाणार असल्याचे सभापती माने यांनी सांगितले.

कोरोना काळ... फाईल गायब

कोरोना काळात 2021 मध्ये काही ठेकेदारांनी तत्कालीन अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ड्रेनेज चेंबर दुरुस्ती, पाईपलाईन टाकण्याची कामे केली. पण त्यांची तीन ते चार कोटीची बिले अद्याप दिलेली नाहीत. दोन ठेकेदारांचा मृत्यू झाला आहे, तर एक आजारी आहे. लेखा विभागातून या कामांच्या फायलीच सापडत नसल्याची बाब स्थायीसमोर आली. त्यावर सभापतींनी सर्व कामांचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT