महापालिकेच्या डॉग शेल्टर, पशू शवदाहिनी प्रकल्पास मंजुरी File Photo
सांगली

Sangli News : महापालिकेच्या डॉग शेल्टर, पशू शवदाहिनी प्रकल्पास मंजुरी

5 कोटी 88 लाखांच्या खर्चास मान्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आखलेल्या 5 कोटी 88 लाख रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून डॉग शेल्टर आणि पशू शवदाहिनी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 70 टक्के शासनाचा असून 30 टक्के हिस्सा महापालिका देणार आहे.

मोकाट कुत्र्यांच्या निवासासाठी आणि त्यांच्यावरील उपचारांसाठी सांगलीवाडी येथे अत्याधुनिक डॉग पॉन्ड उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2 कोटी 51 लाख 80 हजार 402 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर लहान-मोठ्या मृत जनावरांच्या मृतदेहांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समडोळी रोड येथील कचरा डेपो परिसरात पशु शवदाहिनी यंत्र बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 3 कोटी 36 लाख 24 हजार 514 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरोत्थान महाअभियानांतर्गत महानगरपालिकेस 22 कोटी 56 लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे. यामधून यापूर्वी 165 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या नवीन दोन कामांसाठी 5 कोटी 88 लाख 4 लाख 916 रुपयांच्या शासकीय मान्यतेचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT