महापालिका क्षेत्रात 208 प्रजातींची 9.56 लाख झाडे 
सांगली

Sangli : महापालिका क्षेत्रात 208 प्रजातींची 9.56 लाख झाडे

निर्माण केला 4.21 लाख टन ऑक्सिजन : सर्वात कमी 1,346 झाडे मिरजेतील माजी महापौरांच्या प्रभागात

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रातील वृक्ष गणना 85 टक्के पूर्ण झाली आहे. 208 प्रजातींच्या 9 लाख 56 हजार 827 झाडांची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक 88 हजार 968 झाडे कुपवाडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये, तर सर्वात कमी 1346 झाडे मिरजेतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहेत. हा प्रभाग दोन माजी महापौरांचा आहे. हा भाग गावठाण आहे. लोकसंख्येची घनता अधिक असून झाडे कमी आहेत.

शहरीकरण वाढत असताना पहिली कुर्‍हाड वृक्षांवर पडते. शहरीकरण, औद्योगीकरणात हरितपट्टा कमी-कमी होत जातो. पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठी कायदाही केलेला आहे. दरवर्षी वृक्ष लागवड होत असते. त्यावर मोठा खर्चही केला जातो. पण शहरात पूर्वी किती झाडे होती, त्यात नंतर भर पडली की कमी झाली, सध्या झाडे किती आहेत.., हे कसे कळणार ! त्यासाठी वृक्षगणना महत्त्वाची आहे. महापालिका क्षेत्रात वृक्षगणनाच झाली नव्हती. अखेर जानेवारी 2025 मध्ये वृक्षगणना सुरू झाली. आठ महिन्यांत 85 टक्के वृक्षगणना पूर्ण झाली आहे.

देशी झाडांइतकीची विदेशी झाडे

वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात 9 लाख 56 हजार 827 झाडांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 4 लाख 90 हजार 786 देशी, तर 4 लाख 66 हजार 41 झाडे विदेशी आहेत. महापालिका क्षेत्रातील या झाडांनी आजपर्यंत वातावरणातून 1 लाख 57 हजार 893 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला असून 4 लाख 21 हजार 49 टन ऑक्सिजन हवेत सोडला आहे.

महापालिका क्षेत्रात वृक्ष : 9,56,827

देशी झाडे : 4,90,786

विदेशी झाडे : 4,66,041

झाडांच्या प्रजाती : 208

हेरिटेज वृक्ष : 2,442

झाडांनी शोषून घेतलेला कार्बनडायऑक्साईड : 1,57,893 टन

झाडांनी निर्माण केलेला ऑक्सिजन : 4,21,049 टन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT