गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज 
सांगली

Sangli : गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज

कृत्रिम विसर्जन कुंडांची महापालिकेकडून व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आज, मंगळवारी गणेशोत्सवाचा सातवा दिवस. घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. सरकारी घाटासह उपनगरांमधून विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दीड दिवस आणि पाचव्या दिवसानंतर गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशीही गणेश विसर्जन करण्यात येते. यावर्षी गौरीचे आगमन पाचव्या दिवशी झाल्याने बहुतांश घरगुती गणेश विसर्जन आज सातव्या दिवशी होणार आहे. सांगली महापालिकेने याची पूर्ण तयारी केली असून, पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी केली असून मंगळवारी दुपारनंतर या मिरवणुका सुरू होतील. यासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT