रागाने बघितल्याच्या रागातून माय-लेकाला दांडक्याने मारहाण 
सांगली

Sangli Crime : रागाने बघितल्याच्या रागातून माय-लेकाला दांडक्याने मारहाण

सांगलीत चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : आपल्याकडे रागाने का बघितले, असा गैरसमज करून घेत चौघांनी एका तरुणाला आणि त्याच्या आईला लाकडी दांडक्याने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सांगलीतील कोल्हापूर रोडवरील केंगार गल्लीत जुना पटवर्धन दवाखान्याजवळ घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राकेश संजय शिकलगार (वय २३, रा. केंगार गल्ली, सांगली) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य प्रकाश शिकलगार, बालाजी शांताराम कांबळे, गणेश उत्तम संकपाळ आणि रजाक नबी मुल्ला (सर्व रा. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी राकेश यांना घराबाहेर बोलावून घेतले आणि 'रागाने का बघितले' असे विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चौघांनी राकेश यांना लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडाच्या दांडक्याने पाठीवर, हातावर व छातीवर मारहाण केली. दरम्यान, हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या राकेश यांच्या आईलाही संशयितांनी लाकडी दांडक्याने डोक्यावर, डाव्या गालावर व दंडावर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT