कवठेमहांकाळ : गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी (दि. 18) गावाच्या हद्दीतील शेतातील विहिरीत आढळून आला. सतीश शामराव पवार (वय 42, रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे.
सतीश हे मागील शनिवारपासून घरातून बेपत्ता होते. सोमवारी सकाळी रांजणी हद्दीतील शेतात असणाऱ्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत पोलिसपाटील वर्षाराणी चव्हाण यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना माहिती दिली.