मिरजेत भरधाव मोटार थेट घुसली घरात 
सांगली

Miraj Accident : मिरजेत भरधाव मोटार थेट घुसली घरात

अपघातात दोघे किरकोळ जखमी

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरज शहरातील मंगळवार पेठमध्ये आठवडा बाजार होता... वेळ सकाळी साधारण दहाची... अनेकांची बाजारात व ऑफिसला जाण्याची गडबड... एवढ्यात एक इलेक्ट्रिक मोटार भरधाव वेगात आली व वाहनांना धडक देत थेट एका घरात घुसली... क्षणार्धात हा अपघाताचा थरार मिरजकरांना पाहावयास मिळाला.

मिरज शहरातील मंगळवार पेठ येथे मंगळवारी आठवडा बाजार भरतो. याच ठिकाणाहून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक वकील महिला इलेक्ट्रिक मोटार घेऊन निघाल्या होत्या. परंतु या ठिकाणाहून जात असताना अचानक त्यांचा ताबा सुटला व मोटार रस्त्यावरून सुसाट वेगाने धावू लागली. रस्त्याकडेला थांबलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन मोटार थेट एका घरात घुसली. या अपघातामध्ये दोघेजण किरकोळ जखमी झाले.

मोटार एका घरात घुसल्याने मोठा अनर्थ टळला. वकील महिलेच्या ताब्यातील मोटार बाजारात घुसली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु मोटार घरात घुसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपघाताबाबत कोणीही तक्रार दिली नसल्याने याबाबत मात्र मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. अपघातामध्ये मोटार, दुचाकी आणि घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT