सांगली महापालिका क्षेत्रात ५६० ठिकाणी सीसीटीव्ही Pudhari File Photo
सांगली

Sangli News : सांगली महापालिका क्षेत्रात ५६० ठिकाणी सीसीटीव्ही

तुषार दोशी; ई-बाईकवरून ‘दामिनीं’ची गस्त

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वाढती गुन्हेगारी रोखण्यासह वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा एक प्रमुख माध्यम आहे. त्यासाठीच महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक पोलिस ठाण्याचे हद्दीनिहाय सर्वेक्षण करून ५६० स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. आता जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून निधीसाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.दरम्यान, सांगली पोलिस दलात सहा नव्या ई-बाईक दाखल झाल्या असून महापालिका क्षेत्रातील दामिनी पथक वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांगलीसह जिल्ह्यातील प्रमुख शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातून शहरातील गुन्हेगारी रोखण्यास मदत होत होती. तसेच वाहतुकीला शिस्त लागली होती. या सीसीटीव्ही यंत्रणांची देखभाल दुरुस्ती नसल्याने व काही कॅमेरे कालबाह्य झाल्याने ही यंत्रणा मोडकळीस आली. नवे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राधान्याने सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरून सर्वेक्षण करण्याचे आदेश वायरलेस विभागाला दिले. त्यानुसार संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील स्पॉट निश्‍चित करण्यात आली. तसेच वाहतूक कोंडीचेही स्पॉट निश्‍चित झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील ५६० ठिकाणांची यादी निश्‍चित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT