सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : स्वीकृत नगरसेवकच्या 8 पदांसाठी प्रचंड चुरस

17 एप्रिलच्या महासभेत निवड : भाजप 4, काँग्रेस 2, राष्ट्रवादी प्रत्येकी 2 जागा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवकपदांवरील नियुक्तीसाठी दि. 17 रोजी महासभा होत आहे. भाजपच्या 4, तर काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी 2 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. नामनिर्देशित सदस्यांचे अर्ज दि. 10 एप्रिलरोजी कार्यालयीन वेळेत द्यावेत, असे पत्र नगरसचिवांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना दिले आहे. तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चुरस दिसणार आहे.

महापालिकेची महासभा शुक्रवार दि. 17 रोजी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात महापौर-उपमहापौर निवडी झाल्या. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडी लांबणीवर पडल्या होत्या. एप्रिलच्या महासभेत आठ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. महापालिकेत भाजपचे संख्याबळ 39, काँग्रेस 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 तर, शिवसेना 2, असे संख्याबळ आहे. 8 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. संख्याबळानुसार भाजपचा स्वीकृत नगरसेवक कोटा 4 आहे. काँग्रेसचे 2 व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक होतील.

या पार्श्वभूमीवर आठ जागांसाठी नामनिर्देशित नावांची छाननी, पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे शुक्रवार दि. 10 पर्यंत सादर करण्याचे पत्र नगरसचिवांनी भाजपचे गटनेते संदीप आवटी, काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना दिले आहे.

स्वीकृत पदासाठी भाजपकडून केदार खाडिलकर, विश्वजित पाटील, सुजीत राऊत, शीतल लोंढे, विजय पाटील, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतकेर, राहुल बोळाज इच्छुक आहेत. काँग्रेसकडेही इच्छुकांची गर्दी आहे. अमित शहा, प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलगुटगी यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून सचिन सावंत, स्नेहल सावंत, जयंत जाधव, आयेशा नायकवडी, राधिका हारगे, जावेद मोमीन, सतीश कांबळे यांच्यासह अनेक इच्छुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT