मिरज : गुंतवणुकीवर तब्बल 40 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने मिरजेतील सहाजणांना तब्बल 36 लाख 68 हजार 500 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मुनीर अहमद गौस मणेर यांनी फारूख हिबजुरहिमान जमादार आणि सनोबर फारूख जमादार (दोघे रा. मिरज) यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फारूख जमादार व सनोबर जमादार या दोघांनी मुनीर मणेर यांच्यासह सहाजणांना त्यांच्या ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास तब्बल 40 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार 20 मे 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान, सहा जणांकडून वेळोवेळी रक्कम घेतली; परंतु मुदत संपल्यानंतरही त्यांनी गुंतवलेली रक्कम दिली नाही. तसेच त्यावरील जादा परतावाही दिला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मुनीर मणेर यांनी फिर्याद दिली.