Miraj building wall collapse
मिरज : मिरजेतील किल्ला भाग येथे खुशी पार्कचे बांधकाम कोसळल्याने भिंतीखाली 7 जण दबले गेले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.26) दुपारी घडली
किल्ला भागातील खुशी पार्कचे गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम सुरू होते. या ठिकाणी भिंतीचे बांधकाम सुरू असताना कामगारांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. ढिगार्या खालून सर्वांना तातडीने बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु यावेळी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.