बेडग-मंगसुळी रस्त्याचे काम अपूर्ण 
सांगली

Sangli News : बेडग-मंगसुळी रस्त्याचे काम अपूर्ण

35 मीटर खड्डेमय पट्ट्यामुळे अपघातात वाढ

पुढारी वृत्तसेवा

बेडग : जिल्ह्यातील बेडग-मंगसुळी रस्त्यावरील अर्धवट राहिलेल्या कामामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. 35 मीटरच्या खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. तत्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

बेडग-मंगसुळी सुमारे साडेआठ किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेपाच मीटर रुंदीने डांबरीकरण करण्यात आला. या कामासाठी ग्रामपंचायतीमार्फत आमदार सुरेश खाडे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. बेडग गावठाण परिसरातील सुमारे 35 मीटर रस्त्याचे काम अद्यापही रखडले आहे. रस्त्याची उंची वाढवल्यास तेथील घरांच्या परिसरात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी कामावर आक्षेप घेतला. त्यामुळे हा भाग अपूर्णच राहिला आहे.

अर्धा फूट खोल खड्डेमय पट्टा लागत असल्याने वाहनचालकांचा तोल जात आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. चारचाकी वाहनेही वेगात येताना या ठिकाणी अचानक धक्का बसल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन या उर्वरित 35 मीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी सूचना फलक लावण्यात यावेत. वेळेत उपाययोजना न झाल्यास आणखी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT