सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : सांगली, मिरजेसह कुपवाडला आज बंद

वाढीव घरपट्टीस विरोध, महापालिकेवर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात आज महापालिका क्षेत्रात बंद पुकारला आहे. सकाळी साडेदहा वाजता येथील स्टेशन चौकातून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष, विविध व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील बंद आणि मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाढीव घरपट्टीविरोधी कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी व्यक्त केला.

मंगळवारी सकाळी दहा वाजता स्टेशन चौकात नागरिक आणि कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे असून, तेथून मोर्चास सुरुवात होईल. हा मोर्चा स्टेशन चौक - राजवाडा चौक - गणपती मंदिर - सराफ कट्टा - कापडपेठ - बालाजी चौक - हरभट रोड या मार्गाने महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. महापालिकेच्या अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, व्यावसायिक व संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

व्यापारी एकता असोसिएशन, कुपवाड व्यापारी असोसिएशन, कुपवाड संघर्ष समिती, मिरज व्यापारी असोसिएशन, मिरज रिक्षा संघटना, उद्योजक व व्यापारी असोसिएशन, शिक्षण संस्था शिखर संघटना, शिक्षक सेवक सहकारी संस्था, पतसंस्था फेडरेशन, सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशन, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, गणपती पेठ असोसिएशन, कापड पेठ असोसिएशन, हरभट रोड व्यापारी असोसिएशन, जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, मेकॅनिकल असोसिएशन, सांगली जिल्हा हॉटेल चालक-मालक संघटना, दूध डेअरी संघटना, बेकरी प्रॉडक्ट असोसिएशन आदींनी बंदला पाठिंबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT