सांगली : अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित मिलिंद भुई (रा. उदगाव, जयसिंगपूर) याच्याविरुद्ध सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 16 वर्षीय असून ती शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान संशयित मिलिंद याने पीडितेला तिच्या गावातील एका मंदिराजवळ गाठून तिचा अश्लील व्हिडिओ केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केले. आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही तिने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.