Harassment Pudhari
सांगली

Sangli minor harassment: पाठलाग करून अल्पवयीन मुलीची छेडछाड; विरोधानंतर मारहाण, धमकी

शहरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : शहरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने विरोध केला असता, संशयिताने तिला मारहाण करून कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित अशोक शर्मा (रा. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी कवठेमहांकाळ शहरातील एका क्लाससमोरून जात असताना रोहितने तिचा पाठलाग केला. त्याने मुलीचा हात धरून विनयभंग केला. मुलीने प्रतिकार करून स्वतःचा हात सोडवून घेताच, आरोपीने तिला कानशिलात मारून शिविगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास पुन्हा त्याने या मुलीचा पाठलाग केला. ‌‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन‌’, अशी धमकी देत त्याने परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे पीडितेने अखेर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम 12 आणि मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT