Fraud Case 
सांगली

Sangli Fraud Case : दूध व्यवहारात ३० लाखांचा गंडा; कोल्हापूरच्या व्यापाऱ्यावर गुन्हा

थकबाकीची रक्कम देण्यास टाळाटाळ

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : दूध संकलन केंद्रातून दूध खरेदी करून तब्बल ३० लाख २० हजार ७५१ रुपयांची थकबाकी न देता फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप अर्जुन काजळे (रा. टेंबलाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विष्णू तातोबा चव्हाण-पाटील (वय ७१, रा. यमाजी पाटलाची वाडी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून २०२३ ते ५ जुलै २०२३ या कालावधीत संशयित दिलीप काजळे याने फिर्यादी यांच्या दूध संकलन केंद्रातून मोठ्या प्रमाणावर दूध खरेदी केले होते. मात्र, खरेदी केलेल्या दुधाची एकूण ३० लाख २० हजार ७५१ रुपयांची रक्कम देण्यास त्याने वारंवार टाळाटाळ केली. ‘आज पैसे देतो, उद्या देतो’, असे सांगून रक्कम न देता फसवणूक केल्याचे चव्हाण-पाटील यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या फिर्यादीवरून आटपाडी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक करंजकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT