सांगली : या सप्ताहात फळ आणि पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. वांगी, गाजर, पावटा, घेवडा यांचे दर मात्र स्थिर असून, पालेभाज्यांचे दर उतरले आहेत.
भाजी मंडईमध्ये गाजर, वांगी, पावटा, वाटणा आदींची आवक वाढली आहे. फळ भाज्यांचे दर प्रति किलो असे आहेत. गाजर 70 ते 80 रुपये, गवारी 120 ते 140 रुपये, बंदरी गवारी 100 रुपये, लसूण 130 ते 140 रुपये, वांगी 60 ते 80 रुपये, टोमॅटो 30 ते 40 रुपये, दोडका 60 ते 70 रुपये, भेंडी 60 ते 80, ढबू मिरची 50 ते 60, कांदा 25 ते 30, बटाटा 25 ते 30, आले 60, कोबी 30 ते 40 (गड्डा), फ्लॉवर 30 ते 40 (गड्डा), पडवळ 70 ते 80, कारली 50 ते 60, देशी काकडी 60 ते 70, वाटाणा 50 ते 60 रुपये, पावटा 70 ते 80, घेवडा 60 रुपये किलो आहे. शेवगा 25 ते 30 रुपये चार नग, लिंबू 10 रुपयांना दोन ते तीन नग, दुधी भोपळा 10 रुपये नग, लाल भोपळा 80 रुपये किलो, कोथिंबीर 8 ते 10 रुपये पेंढी असून, शेपू, चाकवत, करडई, तांदळ आदी भाज्या 8 ते 10 रुपये, तर मेथी, कांदापात भाज्या 10 ते 15 रुपये पेंढी आहे.
संत्र्यांची आवक वाढली दर उतरले.....
गेल्या तीन आठवड्यांपासून मोसंबी, संत्र्याची आवक वाढलेली आहे. यामुळे संत्री शंभर रुपयांना दीड किलोंनी, तर मोसंबी 90 ते 100 रुपये विक्री सुरू आहे. इतर फळांचे दर प्रति किलो असे - सिमला सफरचंद 120 ते 140, विदेशी सफरचंद 150 ते 200, पेरू 70 ते 80, डाळिंब 100 ते 120, सीताफळ 70 ते 80, चिकू 60 ते 80 रुपये किलो. ड्रॅगन फ्रुट 100 ते 140 किलो, देशी केळी 50 ते 60 डझन, वसई केळी 30 ते 40 डझन, पपई 30 ते 50, अंजीर 160 ते 180, अननस 50 ते 60 रुपये नग.