कर्नाटक आंब्याचे दर उतरले  
सांगली

Sangli News : कर्नाटक आंब्याचे दर उतरले

जांभूळ आता 200 रुपये किलो

पुढारी वृत्तसेवा

सांगली : या सप्ताहात देवगड हापूसचा हंगाम संपत आल्याने दर स्थिर असून, कर्नाटक आंब्याची आवक मोठ्याप्रमाणात वाढल्याने दर गत सप्ताहाच्या तुलनेत निम्म्याने उतरले आहेत. 400 रुपये किलोवर पोहोचलेली जांभळे आता आवक वाढल्याने दोनशे रुपये किलो झाली आहेत. देवगड हापूसची आवक आता कमी होत चालली आहे. हापूसचा दर अजूनही 500 ते 600 रुपये डझन आहे.

या सप्ताहात कलिंगडांची आवक वाढली असली तरी दर तेजीतच आहेत. कलिंगड आता दीडशे रुपयांना दोन झाली आहेत. विदेशी सफरचंद 200 ते 250 रुपये किलो असून, न्यूझिलंडचे सफरचंद 300 ते 400 रुपये किलो आहेत. संत्रा शंभर रुपये, तर मोसंबी 90 ते 100 रुपये किलोने विक्री सुरू आहे. पेरू 50 ते 60, डाळिंब 120 ते 150, चिकू 50 ते 60 रुपये किलो. रामफळ 140 ते 150 रुपये, ड्रॅगन 200 ते 250 रुपये किलो, देशी केळी 50 ते 60 रुपये डझन, वसई केळी 30 ते 40 रुपये डझन, पपई 30 ते 50, अननस 50 ते 60 रुपये नग आहे. ही माहिती फळ विक्रेते अदनान मुन्शी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT