कोळसा, लाकूड, विद्युत शेगड्यांना मागणी वाढली 
सांगली

Sangli News : कोळसा, लाकूड, विद्युत शेगड्यांना मागणी वाढली

व्यावसायिक सिलिंडर मिळेनात ः हॉटेल व्यवसाय अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आखाती देशांतील युध्दामुळे गॅस टंचाई आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने अनेकांनी स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा पर्याय निवडला आहे. याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असतानाच, आता पुन्हा कोळसा, लाकूडफाट्यालाही मागणी वाढू लागली आहे.

स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक कुकर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कुकटॉप, ओटीजी-ओव्हन, टोस्टर, ग्रील, मल्टी कुकर, इलेक्ट्रिक तवा, एअर फ्रायर, इलेक्ट्रिक स्टिमर, हॉट प्लेट यांच्या खरेदीत वाढ झाली आहे. बाजारात या साहित्यासाठी किमान वीस टक्के मागणी वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ही मागणी अचानक वाढली आहे. वास्तविक हे दोन्ही पर्याय बऱ्याच वर्षांपासून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र अचानक मागणी वाढल्याने आता या वस्तूंचाही तुटवडा होण्याची शक्यता आहे. जळाऊ लाकूड, कोळशालाही मागणी वाढली आहे.

कोळसा व्यापारी विनायक पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये कोळशाच्या मागणीत थोडी वाढ झाली आहे. खासकरून तंदूर भट्टी, ढाबा चालकांकडून मागणी होत आहे. हॉटेल चालकांकडूनही कोळशाच्या शेगडीसाठी मागणी होऊ लागली आहे. सध्या तरी कोळशाचा दर स्थिर म्हणजे 40 रुपये किलो आहे. लाकूड व्यापारी इलाई मुजावर यांनी सांगितले की, सध्या रमजान महिना असल्यामुळे सर्वत्र इफ्तारसाठी जेवण बनवले जाते. ते बनवण्यासाठी गॅसची टंचाई जाणवत असल्याने लाकडांना मागणी वाढली आहे. सार्वजनिक महाप्रसादासाठीही लाकडांना मागणी असते. पण गेल्या चार दिवसांपासून गॅसवर खाद्यपदार्थ बनविणारे हॉटेलचालकही लाकडांची मागणी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT